गतकालीन गोमंतकीय मुत्सद्दी (Historical Goan Diplomats) is a 1962 book written by Narayan Bhaskar Nayak, Rivon, Goa. It has short essays on 85 such personalities, belonging to the GSB community. This article on Rama Kamat has some interesting insights, hence sharing a translation of the same for posterity.
Rama Kamat
His birthplace is Kundai. Around the year 1662, when the King of Portugal gave Mumbai to the English, its rights naturally came to the East India Company. After this, for business purposes, some people from Gomantak (Goa) went there and settled down due to trade and business reasons. In the year 1685, at the age of 35, Ram Kamath also went to Mumbai and stayed there permanently. He used to trade in tobacco. Clever intellect, and favorable times helped him earn a lot of money in business
Later, he obtained the brokerage of the East India Company
In the year 1687, the East India Company appointed him as the chief officer at their mint
Later, in 1697, he became the commander of the company's local forces
On June 23, 1694, the Company Government appointed him to the position of 'Master General of the Black Army'
The Chalukyan-era Walkeshwar temple in Mumbai had been destroyed during foreign rule
Near his residence in the Fort, Ram Kamath had built two temples—Venkatesh and Samliyalal—and adjacent to them, a small monastery (math) for the residence of the heads of the Shri Gokarna Math during their travels
Overall, Ram Kamath was a prominent figure of that time, highly renowned as an honorable gentleman, a great merchant, a valiant swordsman, and a skilled diplomat
However, due to a misunderstanding, he suffered terrible losses at the hands of the British in his final days!
Original Marathi Content
यांची जन्मभुमि कुंडई. सन १६६२ च्या सुमारास पोर्तुगालच्या राजानें मुंबई इंग्रजांना दिल्याने तिचे अधिकार साहजिकच ईस्ट इंडिया कंपनीकडे आले. यानंतर व्यवसायाच्या निमित्ताने कांही गोमंतकीय गृहस्थ तिकडे गेले व उद्योग-व्यवसायाच्या कारणाने तेथे स्थायिक झाले. सन १६८५ साली आपल्या वयाच्या ३५ व्या वर्षी राम कामतहि मुंबईस जाऊन तेथेच वास्तव्य करून राहिले. ते तंबाखूचा व्यापार करीत.चलाख बुद्धि, अनुकूल काल यांमुळे व्यापारांत त्यांनी बराच पैसा मिळविला.
पुढे त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीची दलाली मिळविली. तंबाखूप्रमाणेच शिसें, लोखंड, कथील, साखर, अफू यांचाही व्यापार ते मद्रास, कलकत्ता, इराणी आखातांतील आब्बास बंदरापर्यंत करीत. वाढल्या व्यापारास जरूरी भासल्याने त्यांनी चार स्वतंत्र जहाजे बाळगून त्यांच्यावर हिंदी खलाशांप्रमाणेच इंग्रज खलाशीही नोकरीस ठेवले. मुंबईत कोटांतील बडाबाजारमध्ये या जहाजांचे निवासस्थान होते.
सन १६८७ साली ईस्ट इंडिया कंपनीने त्यांना आपल्या टाकसाळीवर मुख्याधिकारी नेमले. आपला कामचलाऊ व्यवहार लाला कामत या आपल्या बंधूकडे सोपवून त्यांनी टाकसाळीवरचेही काम पाहण्यास सुरुवात केली.
पुढे सन १६९७ त कंपनीच्या एतद्देशीय फौजेचे ते सेनापती झाले. ते व्यापारात जसे हुशार तसेच तलवार गाजवण्यात व मुत्सद्देगिरीतही फार कुशल होते. शिद्दी याकुबखानाने पंचवीस हजार सैन्यानिशी मुंबईवर स्वारी केली त्यावेळी राम कामत अत्यंत शौर्याने लढले व त्यांनी शिद्दी यास २२ जून १६९० रोजी मुंबईतून कायमचा घालवून दिला.
ता. २३ जून १६९४ रोजी कंपनी सरकारने त्यांची ‘मास्टर जनरल ऑफ दि ब्लॅक आर्मी’ या हुद्द्यावर नेमणूक केली. यानंतर लवकरच ते मुंबईचे कलेक्टर झाले. सन १७१८ साली राम कामत ब्रिटिश एतद्देशीय सैन्याचे कमांडर होते. विजयदुर्ग येथे कान्होजी आंग्रे यांच्यांशी त्यांची मोठी लढाई झाली होती. या लढाईत त्यांनी जे शौर्य व मुत्सद्दीपणा दाखविला त्याबद्दल गव्हर्नरने तरवार व मेडल देऊन त्यांचा गौरव केला.
मुंबईचे चालुक्यकालीन वाळुकेश्वर देवालय परकी अंमलांत उध्वस्त झाले होते. ते कामत यांनी स. १७०३ साली पुनः बांधले. मलबार हिल त्यांच्याच ताब्यात होती. सदर देवालय, धर्मशाळेजवकची वाडी, बाणगंगेजवळील खुली जागा आजहि सारस्वत ट्रस्टीच्या ताब्यात आहे.
राम कामत यांनी कोटांत आपल्या निवासस्थानाजवळ व्यंकटेश व सामलियालाल ही दोन देवालये व त्यांना लागूनच संचारार्थ गेल्यास श्रीगोकर्णमठाधीशांच्या वास्तव्यासाठी एक छोटा मठ बांधला होता. कामतांच्या मागे देवालयांची व धर्मशाळा वगैरेची स्थिती ठीक राहिली नाही. शेवटी तंटा लागून प्रकरण कोर्टात गेले आणि देवलें राम कामत यांनी बांधली असून ती गौड सारस्वत जातीची व सार्वजनिक असल्याचा हायकोर्टाने निकाल दिला. सांप्रत हा भाग ट्रस्टींच्या ताब्यात आहे.
एकंदरीत राम कामत हे त्या काळातील बडे प्रस्थ असून सन्माननीय सद्गृहस्थ, बडे व्यापारी, तरवारबहाद्दर आणि कुशल मुत्सद्दी म्हणून फार नांवाजले.
गैरसमजामुळे अखेरच्या कालांत मात्र इंग्रजांकडून त्यांची भयंकर नुकसानी झाली!
No comments:
Post a Comment